एक सिगारेट नाही आता अख्ख पाकिटच खरेदी कराव लागणार

सुट्या सिगारेट विकत घेणार्‍यांची संख्या अधिक आहे. एक किंवा दोन अशा सुट्या स्वरूपात सिगारेट उपलब्ध झाल्या नाहीत, तर तरुणाई तितक्या प्रमाणात व्यसनाच्या अधीन जाणार नाही, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. सिगारेटच्या पाकिटावर दुष्परिणांमाबाबत वैधानिक इशारा छापलेला असतो. मात्र, सुट्या सिगारेट विकत घेणार्‍याला अशा प्रकारचा कोणताही वैधानिक इशारा लेखी स्वरूपात देता येत नाही. त्यामुळे राज्यभरात कुठल्याही पान टपरीवर किंवा इतरत्र कुठेही सुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने बंदी घातली आहे. या निर्णयामुळे पान टपरी दुकानदारांना काय फटका बसणार आहे यासंबंधी महानगरचा हा ग्रांउड रिपोर्ट….