सिनेमागृह, मल्टिप्लेक्स होणार सुरू; मार्गदर्शक तत्त्वे जारी

देशभरात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. विविध उद्योग पुन्हा एकदा सुरू केले जात आहेत. मार्च महिन्यापासून बंद असलेले सिनेमागृह आता अखेर उघडण्यात येणार आहेत. तर १५ ऑक्टोबरपासून सिनेमागृह उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, सिनेमागृहाच्या एकूण प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के लोकांना एकावेळी सिनेमा पाहता येणार आहे. दरम्यान, याकरता केंद्र सरकारकडून सिनेमांच्या प्रदर्शनासाठी एसओपी 0जारी करण्यात आली आहे. या नियमांनुसार काही कडक नियम पाळणे अनिवार्य असणार आहे.