क्लिनअप कर्मचारी विना मास्क करतायत दंड वसूल

कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून मुंबईत जरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली तरी पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे ‘क्लिनअप कर्मचाऱ्यां’कडूनच कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. क्लिनअप कर्मचारी विना मास्क दंड वसूल करत असल्याचा प्रकार शिवडी नाका येथे घडल्याचे समोर आले आहे.