७ जुलैपर्यंत कोरोना लसीचे क्लिनिकल ट्रायल

MUMBAI

भारत बायोटेक आणि ICMRने एकत्रित बनवलेल्या आणि स्वदेशी असलेल्या कोरोनावरील कोव्हॅक्सिन या लसीची लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतली जाणार आहे. ७ जुलैपर्यंत ही ट्रायल घेऊन लस लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ही ट्रायल लवकरात लवकर झाली तर १५ ऑगस्ट पासून त्याचा वापर करता येऊ शकेल, असाही अंदाज टोपे यांनी व्यक्त केला.