एकमेकांच्या विश्वासावर दीपावलीचा सण साजरा करूया

गेल्या अनेक महिन्यांमध्ये जे कोरोनाच्या बाबतीत आतापर्यंत शिस्तीने कमावल ते गमवायचे नाही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी साजरा करण्याबाबतच्या अटी व शर्थी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितल्या. सार्वजनिक ठिकाणी फटाके बंदी कायम असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. पण इतरांना त्रास होणार नाही असा स्वरूपाने जबाबदारीने आणि एकमेकांवर विश्वास ठेऊन दिवाळी साजरी करूया असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.