कोरोनाविरोधातली लढाई सुरूच राहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाश्चिमात्य देशांमध्ये कोरोनाची लाट उसळल्याने पुन्हा सुरू झालेला लॉकडाऊन याबाबतची माहिती आजच्या फेसबुक लाईव्हच्या संवादातून दिली. आतापर्यंत कोरोनाविरोधात लढाईमध्ये जी जबाबदारी दाखवली तशीच जबाबदारी आगामी काळातही अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या काळातही मास्क वापरून ही लढाई कायम ठेवायची आहे याची पुन्हा एकदा आठवण त्यांनी करून दिली.