भिवंडीत लूम कारखान्यांना सशर्त परवानगी

MUMBAI

कंटेन्मेंट झोन वगळता भिवंडीत इतर ठिकाणी लूम कारखाने सुरू करण्यात आले आहेत. याबाबत भिवंडी निजामपूर महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी घोषणा केली आहे. लॉकडाऊन ४.० मध्ये राज्य शासनाने काढलेल्या नव्या नियमावलीमध्ये २१ मे पासून काही गोष्टींवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामध्ये लूम कारखाने यांचाही समावेश आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करून कामगारांना प्रवेश देण्यात यावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here