कंगनाचे बॉलिवूड नंतरचे आता मिशन ‘पॉलिटिकल’

कंगनानं शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुंबई शहराला ‘पाकव्याप्त काश्मीर’ची उपमा दिली. कंगनाचं हे वक्तव्य गेल्या आठवड्याभरातील वादाला मोठी फोडणी देणारं ठरलं. त्यानंतर दोन्हीकडून म्हणजे कंगना आणि शिवसेना यांच्याकडून एकमेकांवर सातत्यानं टीका होत राहिली. मात्र, कंगना वाद हे एक अतूट ‘नातं’ आहे. कारण यापूर्वी देखील कंगनाने अनेकांवर आरोप केले होते.