कोरोनामुळे इव्हेंट मॅनेजमेंटचे तीनतेरा!

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेशी निगडित सगळ्याच क्षेत्रांना फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणावर छोटे आणि काही प्रमाणात मोठे उद्योगधंदे बंद झाले. या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या हजारो, लाखो लोकांचे रोजगार गेले. या सगळ्या उद्योगांची चर्चा गेल्या ५ ते ७ महिन्यांमध्ये माध्यमांमध्ये दिसून आली. पण इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रावर अद्याप कोरोनाच्या झालेल्या परिणामावर कुणीही बोलताना दिसत नाही. या क्षेत्रावर देखील हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. पण तरीदेखील त्यावर चर्चा होताना दिसत नाही. इतर क्षेत्र काही प्रमाणाच कामकाजासाठी खुली देखील झाली. पण या क्षेत्रावर मात्र सरकारची अद्याप तितकी मेहेरनजर झाल्याचं दिसत नाही.