मच्छिमारांच्या अडचणी, केली मंत्र्यांना विनंती

MUMBAI

अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृतीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी राज्याचे मत्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांच्याकडे मच्छिमारांच्या समस्या मांडल्या. देशात व राज्यात २१ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यापूर्वी मासेमारीसाठी गेलेल्या बोटी आता गेल्या चार-पाच दिवसांपासून बाजारासाठी धक्क्यावर, जेट्टीवर बंदरात आल्या. परंतु कोणीही सप्लायर किंवा विक्रेते मासळी विकत घेऊ इच्छित नसल्याने लाखोंचे मासे बेवारस अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे मच्छिमारांना मासळी विकण्यासाठी परवानगी देण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळवण्यात यावेत, अशी मछिमारांतर्फे तांडेल यांनी विनंती केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here