पुतणीची हत्या करत असताना पत्नी देत होती पहारा

महिन्याभरापूर्वी उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे झालेल्या दलित तरुणी सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. तशीच काहीशी घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीतील नंदगिरी परिसरात शिक्षणासाठी काकाच्या घरी राहणाऱ्या सतरा वर्षांच्या पुतणीवर काकानेच बलात्काराचा प्रयत्न केला .मात्र बलात्काराचा प्रयत्न फसल्यानंतर काकानेच आपल्या १७ वर्षीय पुतणीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.हत्यानंतर मुलीचा मृतदेह बेड बॉक्समध्ये लपवून ठेवला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दिल्लीमधील नंदगिरी परिसरात गेल्या महिन्यात हा प्रकार घडला.