सरकारने कोरोना उपाययोजनेत भ्रष्टाचार केला

महाराष्ट्राने सुरुवातीपासून कोरोनाशी नाही तर आकडेवारीशी आपली लढाई केली. आकडे कसे लपविता येतील. याचाच प्रयत्न सरकारने केला. सरकारने जे कोविड सेंटर उभे केलेत. ते भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहेत. ते कुणाच्या फायद्यासाठी आहेत? कुणाच्या नातेवाईकांना कंत्राटे मिळाली आहेत, हे आम्ही बाहेर आणूच. मात्र सरकारने कोविड सेंटरमध्ये केलेला भ्रष्टाचार हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.