कोरोनाच्या संकटावर मात करत बाजारात दिवाळी अंक आले

कोरोना विषाणूच्या संकटामुळे २०२० हे संपुर्ण वर्ष आर्थिक मंदीच्या छायेत गेले. अनेक उद्योगधंद्यांना आर्थिक फटका बसला. बेरोजगारी वाढली. याचा थेट परिणाम पुस्तकांच्या व्यापारावर झाला. त्यात महाराष्ट्रात दिवाळी अंकाची मोठी पंरपरा आहे. कोट्यवधीचे मार्केट असलेले हे दिवाळी अंक यावर्षी देखील सकस मजकुरासहीत प्रकाशित झाले आहेत. दादर येथील गणेश बुक डेपोच्या प्रशांत शिंदे आणि शंकर पाटील यांनी मोठ्या हिंमतीने या कठिण काळात पुस्तकांच्या व्यवसायात उडी घेत दिवाळी अंक विक्रीसाठी ठेवले आहेत. त्याचा घेतलेला हा आढावा.