सत्ताधाऱ्यांना भेटू नका, गैरसमज पसरतो

Mumbai

२१ ऑक्टोबरला मतदान होईपर्यंत तरी सत्ताधाऱ्यांना संध्याकाळी भेटू नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हडपसर येथे बोलताना केले. चेतन विठ्ठल तुपे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेला ते संबोधित करत होते. “आज सोशल मीडिया मजबूत झाला असून तुम्ही जर विरोधकांना भेटलात तर तात्काळ त्याचे फोटो काढून व्हायरल केले जातात आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांची भेट टाळाच”, असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे.