राष्ट्रपती राजवटीत रुग्णांचे हाल

Mumbai

राष्ट्रपती राजवट लागल्यापासून मंत्रालयातील राज्य सरकारचा मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष बंदच आहे. अनेक राजकीय नेत्यांनी विनंती करुनही या कक्षाला टाळे लागलेले दिसत आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मदतीची याचना करायला आलेले हजारो रुग्ण मदतीपासून वंचित आहेत. आज मराठावाड्यातून आलेल्या काही रुग्णांशी माय महानगरचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी बातचीत केली. यावेळी आपल्या व्यथा सांगताना रुग्णांना अश्रू अनावर झाले होते.