नाशिकमध्ये कांद्याच्या चाळीवर वीज पडून लाखोंचा कांदा जळून खाक

MUMBAI

शेतकऱ्यांच्या वाटेवर कायमच संकटे पेरलेली असतात. मग ती संकटे नापिकीची असो, कर्जबाजारीपणाची असो, शेतमाल हमीभावाची असो अथवा हवामानाची असो. असेच संकट बागलाण तालुक्यातील मेंढीपाडे येथील शेतकऱ्यावर आले असून शेतातील राहत्या घरावर व कांदा चाळीवर वीज पडल्याने कांद्याच्या चाळीसह संसार, शेतीअवजारे आगीत जळून खाक झाली.