आयोजकांना देणगीदार मिळेनात!

Mumbai

सांगली-कोल्हापूर मध्ये आलेल्या पुरामुळे जरी मुंबईसह ठाण्यात दहीहंडीचे प्रमाण कमी झाले असले तरी मुंबईतील दहीहंडी कमी होण्याचे आणखी एक कारण आहे. दहीहंडी साजरी करायची म्हणजे आयोजकाना पैशाची जमवा जमव करावी लागते. कधी हे आयोजक एखाद्या मोठ्या विकासकाकडून निधी जमा करतात तर काही व्यावसायिक निधी देत असतात. मात्र यंदा या दोघांनीही निधी देण्यास हात आखडता घेतल्याने आयोजकांना फटका बसला.