प्रेक्षक पुन्हा झिंगणार ‘एकच प्याला’त

Mumbai

१९१९ च्या सुमारास रंगभूमी गाजवणारे नाटक म्हणजे ‘एकच प्याला’. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले हे नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिले. तब्बल १०० वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा नव्या रूपात रंगभूमीवर दाखल झालं आहे.