नाथाभाऊ तुमच ड्रायर क्लिनर राहीलच

एकनाथ खडसे यांनी आपल्या विधानसभेतील समारोपाच्या भाषणात ४० वर्षांच्या राजकीय प्रवासात आपल्यावर लागलेले डाग साफ व्हावेत अशी मागणी पक्षाकडे, सभागृहाकडे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही केली होती. माझ्यावर लागलेल्या आरोपात तथ्य नाही, पण राज्यातील बहुजन समाज म्हणून कुटुंब म्हणून माझ्यावरचे ते डाग पुसले जाणे गरजेचे असल्याचा पुर्नरूच्चार त्यांनी केला होता.