एकनाथ शिंदे यांनी केली कोरोना रुग्णांची विचारपूस

MUMBAI

राज्याचे नगर विकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वतः पीपीई किट परिधान करून हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची विचारपूस केली. एकनाथ शिंदे यांनी महिला वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांना कोणत्या गोष्टीची आवश्यकता तर नाही ना, याची खात्री करून घेतली. शिवाय डॉक्टरांसोबत पीपीई किट घालून ते वॉर्डमध्ये वावरताना दिसत आहे.