शेतकऱ्यांसाठी इंजिनिअरने सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी

३ एकर जमिनीवर जेवढा चारा उगवतो, तेवढा चारा एका ५०० स्क्वे. फूटच्या जागेत उगवून दाखविण्याची किमया कृषी रत्न पुरस्कार विजेते आणि अभियंता- अश्विन सावंत यांनी करुन दाखवली आहे. इस्रायलचे तंत्रज्ञान वापरून अश्विन सावंत यांनी हायड्रोफोनिक फोडर (बंदिस्त निर्मित चारा) प्रयोग यशस्वीरित्या राबविला आहे. आपलं महानगरचे कार्यकारी संपादक संजय परब यांनी अश्विन सावंत यांच्या या प्रयोगबाबत सविस्तर मुलाखत घेतली आहे.