पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांवर आली आत्महत्येची वेळ

परतीच्या पावसाने राज्यात अक्षरश: कहर केला. अनेक भागात बुधवारी पावासाने रौद्ररुप धारण केले. पालघर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या वादळी पावसाने मोठ्या भात शेतीचे नुकसान केले. यात शेतकरी पावसाने कापणी केलेली भात पिके ही पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. हे नुकसान पाहून आता आमच्यावर आत्महत्येची वेळ आली असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.