मालाडमधील पठाणवाडी येथील प्लायवूडच्या गोडाऊनला आग

मालाड पूर्व येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आगीची घटना घडली आहे. पठाणवाडी येथील प्लायवूडच्या गोडाऊनला भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या रवाना झाल्या आहेत. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.