मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Mumbai

राज्यातील २ लाख पारंपारिक मच्छिमारांना मासळीचा दुष्काळ भेडसावत आहे. या वर्षी उत्पन्नात ८० टक्केपेक्षा जास्त घट झाली आहे. त्याचप्रमाणे परराज्यातून होणाऱ्या मासेमारीवर आळा बसावा, त्यांच्यावर कारवाई व्हावी अश्या मागण्या सिंधूदुर्गातील मच्छिमारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर आहेत.