दसऱ्याचा संकल्प करा; ‘या’ वाईट सवयी सोडा!

दसरा म्हणजे असत्यावर सत्याचा विजय. नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर अश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. दसरा किंवा विजयादशमी श्रीरामांच्या विजयाच्या रुपाने आणि दुर्गा मातेच्या पूजेच्या रुपात साजरा करण्यात येतो. कथा, पद्धती, परंपरा वेगळ्या असल्या तरी मूळ संदेश तोच असतो. चांगल्याचा वाईटावर, सत्प्रवृत्तींचा खलप्रवृत्तींवर विजय. त्यामुळं यंदा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर काही वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करण्यासाठी दसरा हीच योग्य वेळ आहे.