चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

राज्यातील सरकारी हॉस्पिटल्समधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी मंगळवारपासून काम बंद आंदोलनावर गेले आहेत. अनेक वर्षांपासून हॉस्पिटल्समध्ये सेवा देणाऱ्या कामगारांची कायमस्वरुपी नियुक्ती करावी, तसंच रिक्त पदांची तात्काळ भरती करावी या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. या आंदोलनात राज्यातील ५० हजारांपेक्षा जास्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाले आहेत.