मेडीकल फिल्डकडून हॉटेल मॅनेजमेंटकडे

मेडीकल क्षेत्रातून शिक्षण घेत असतांना मला हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्र खुणावू लागले. खरं मला लहानपणापासूनच कुकिंगची आवड होती त्यामुळे मी मेडीकल फिल्ड सोडून हॉटेल मॅनेजमेंटकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला काही अडचणी आल्या परंतु , कोणतेही क्षेत्र निवडतांना त्यात तुम्हाला मनापासून आवड असायला हवी इतकंच नव्हे तर प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारीही हवी. या गोष्टींची जर खुणगाठ मनाशी बाळगली तर मग आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. याच सुत्रानुसार मी हॉटेल मॅनेजमेंटकडे वळले. आज आपल्या माध्यमातून लोकांना विविध खाद्यपदार्थांची चव चाखतांना आनंद मिळतो. नाशिकच्या अग्रणी हॉटेलमधे चीफ शेफ म्हणून जबाबदारी पार पाडणार्‍या चीफ हेड प्रिती शर्मा यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत……