मस्कतमध्ये धुमधडाक्यात साजरा होतोय गणेशोत्सव

Mumbai

मस्कत मराठी मित्र मंडळ, दर वर्षी गणेशोत्सव साजरा करतात. ह्या गणेशोत्सवाला ४० वर्षांपेक्षा अधिक परंपरा आहे. इथल्या कृष्णा टेम्पल मध्ये ५ दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. पूर्वी शाडू च्या मूर्ती ची प्रतिष्ठापना व्हायची, मात्र गेल्या काही वर्षांपासून विसर्जनाच्या अडचणी मुळे  मग पंचधातू ची मूर्ती बसवली जाते.