Valentine Day: हृदयात असलेलं नाव पेन्सिलच्या टोकावर कोरा

Mumbai

व्हॅलेंटाईन डे म्हटलं की आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटवस्तू देण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. त्यासाठी आपण विविध कल्पना लढवतो. मुंबईतील सुशांत भोसले हा तरुण कलाकार तुमच्या जोडीदारासाठी खास गिफ्ट उपलब्ध करुन देतोय. तुमच्या हृदयात असलेलं नाव तुम्ही सुशांतच्या मदतीने पेन्सीलच्या टोकावर कोरु शकता. तसेच तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम का करता, याची शंभर कारणं देखील गिफ्ट रॅप करुन सुशांत तुम्हाला देतोय.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here