हॉटस्पॉट मुंब्रा कोरोनामुक्त झालं कसं?

ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत मोडणारा मुंब्रा या प्रभागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघून येथील चिंता वाढली होती. मात्र मुंब्रा येथील आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना मुंब्रा प्रभाग मात्र हळूहळू कोरोना मुक्तीच्या मार्गावर होता. आज मुंब्रा प्रभाग जवळजवळ कोरोनामुक्त झाला असून या प्रभागात एकही हॉटस्पॉट नाही. येथील कोरोना रुग्णांची संख्या आता बोटांवर मोजण्याइतकीच उरली आहे.