सावधान! तुमचीही होते अपुरी झोप!

आपल्या मेंदूनं व्यवस्थित काम करावं यासाठी ८ तास झोप मिळण्याची गरज असते. मात्र, हल्ली बऱ्याच कारणांनी झोप अपुरी राहते. त्याचे परिणाम हळूहळू दिसायला सुरुवात होते. बदललेली शैली, कामाच्या वेळा, असणारा ताणतणाव, मोबाईल अथवा गॅझेट्सचा अतिवापर या सगळ्यामुळे सध्या झोप कमी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अपुरी झोप अर्थात निद्रानाश. यामुळे आरोग्यावर अतिशय विपरित परिणाम होतात. झोप न येण्याची कारणं काहीही असली तरी त्याचा मेंदूवर नकारात्मक परिणाम होत असतो. जाणून घेऊया काय होतात अपुऱ्या झोपेचे परिणाम?