आयुक्तांनी सांगितला कोरोनाचा रामबाण उपाय!

आख्ख्या जगातले संशोधक, डॉक्टर, तज्ज्ञ कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या देशांमधल्या मातब्बर संघटना काम करताना दिसत आहेत. मात्र, असं असलं, तरी अजूनही कोरोनावरची प्रभावी लस अजूनही सापडलेली नाही. या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस आपल्याकडे नसताना कशा पद्धतीने आपण कोरोनाला आवर घालू शकतो, कोणत्या गोष्टी या कोरोनावर रामबाण उपाय ठरू शकतात याविषयी ठाण्याचे पालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते स्वत:, ठाणे पालिकेतील सर्व प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी या उपायांचं पालन करत असून त्याच माध्यमातून कोरोनाला लांब ठेवण्यात त्यांना यश आल्याचं विपीन शर्मा यांनी सांगितलं आहे.