‘एन्काऊंटर करुन भागणार नाही’|

Mumbai

हैदराबादमधील महिलेवर झालेल्या बलात्कारानंतर जाळून टाकल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी चार आरोपींचा एन्काऊंटर केला. एन्काऊंटरविषयी सामान्य जनतेकडून पोलिसांचं कौतुक केलं जातंय तर, दुसरीकडे बलात्कार होऊ नये यासाठी कायमचा तोडगा निघायला हवा अशी प्रतिक्रिया तृतीयपंथी दिशा पिंकी शेख यांनी दिली आहे.