खासगीकरण झाले तर एकाही बेस्ट कर्मचाऱ्याची नोकरी जाऊ देणार नाही

Mumbai

बेस्ट संप मिटवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित बसून चर्चा केल्यास मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. संपाचा निर्णय आता कोर्टाकडे आहे तरी देखील माझी गरज असेल तर चर्चेला तयार आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. खाजगीकरण हा अंतिम पर्याय नसून, खाजगीकरण जरी करायचा विचार समोर आला तरीही मालकी हक्क आम्ही जाऊ देणार नाही तसेच संपूर्ण खाजगी करणं होऊ देणार नाही झालं तर फक्त काही बस गाड्याचा असू शकेल मात्र यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे त्यानी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here