Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर व्हिडिओ सटाण्यातील क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांकडे दुर्लक्ष

सटाण्यातील क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांकडे दुर्लक्ष

Mumbai

सटाणा नगरपालिकेच्या वतीने अजमिर सौदाणे येथे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारले आहे. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. पावसाचे पाणी साचले आहे. डासांचा प्रादुर्भाव आहे. स्वछता अजिबात नाही. निकृष्ट दर्जाचे जेवण, पाणी व चहाची सोय नाही. रुग्णांना कोंडून ठेवले आहे. या ठिकाणी आजतागायत सोयीसुविधा पुरवण्याच्या नावाखाली मोठ्या रकमेची बिले काढली गेली आहेत. मात्र प्रत्यक्षात रुग्णांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र देवरे यांनी केला असून या सर्व प्रकारची चौकशी करण्याची मागणी सटाणा तहसीलदार यांच्याकडे केली आहे.