बीड जिल्ह्यात महिलेने केले विजेच्या खांबावर चढून वायर फिक्स

महिलादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. महिला कोणत्याच काम मागे नाही, हे सांगणारा हा व्हिडिओ आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात उषा जगदाळे या महिलेने चक्क विद्युक खांबावर चढून स्नॅप केलेले वायर फिक्सिंगचे काम केल्याचा हा व्हिडिओ ऑल इंडिया रेडिओने त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.