सिंधुदुर्गातील जिल्हाधिकारी मंजू लक्ष्मी यांची माहिती

MUMBAI

गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ देशासह राज्य लॉकडाऊन असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या मे महिन्यात मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना कोकणात जाणे शक्य झाले नाही. तरी मधल्या काळात सरकारने सुरू केलेल्या ई पास सेवेवर काही चाकरमानी सिंधुदुर्गात गेले आहेत. या जिल्ह्यातील सद्यपरिस्थिती येथील जिल्हाधिकारी मंजू लक्ष्मी यांनी सांगितली असून आता यापुढील क्वारंटाईनच्या नियमांबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. तसेच यापूर्वी जिल्ह्यात बाहेरून आलेल्यांना २८ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी बदलून आता तो १४ दिवसांचा करण्यात आला आहे.