घरव्हिडिओमालवाहतूकीमुळे घोड्यांना झाल्या जखमा

मालवाहतूकीमुळे घोड्यांना झाल्या जखमा

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात माथेरानमध्ये शेकडो घोड्यांच्या पाठीवरून जीवघेण्या ओझ्याची वाहतूक केली जात आहे. एका घोड्याच्या पाठीवर चार-पाच गॅस सिलेंडरसह इतर ओझे ठेवून त्यांना माथेरानचा डोंगर चढवला जात आहे. या गैरवर्तनाबद्दल घोड्यांच्या मालकांवर कारवाई केली जावी, अशी मागणी पशुप्रेमी संस्थांनी केली आहे, अशाप्रकारची बातमी काही दिवसांपूर्वी ‘आपलं महानगर’ने दिली होती. त्यानंतर एनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने दखल घेत, याबाबत रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून संबंधित घटनेची माहिती घेऊन सात दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याशिवाय पॉज (मुंबई) या प्राणीमित्र संस्थेने मालवाहतूक घोडा मालक यांस समज पत्र आणि स्थानिक पोलीस ठाण्याला ही एक पत्र देण्यात आले आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबतचे अधिनियमन १९६० चे कलम ११ (१) (अ) कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -