विराटचा अखेरचा प्रवास

भारतीय नौदलातील आयएनएस विराट या युद्धनौकेला नुकताच निरोप देण्यात आला. तब्बल ३० वर्ष भारतीय नौदलाला साथ देणाऱ्या विराटने अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. यामुळे विराटला नौदलात वेगळे स्थान आहे. भारतीय नौदलाच्या इतिहासात विराट आणि विक्रांत या यु्दधनौकांची नोंद करण्यात आली आहे. विक्रांत सेवानिवृत्त झाल्यानंतर भारतीय समुद्र तटांवर तब्बल २० वर्ष विराटने पहारा दिला. विराटला आता निरोप देण्यात आला असून गुजरातमधील अलंग येथील जहाज कारखान्यात त्याची रवानगी करण्यात आली आहे.