- Advertisement -
मरिन ड्राइव्हवर काही दिवसांपूर्वी दोघं जण बुडाले. त्यापैकी एक १२ वर्षांचा मुलगा होता आणि दुसरा होता तो म्हणजे २१ वर्षीय जावेद खान. मरिन ड्राइव्हच्या कठड्यावर बसून समुद्राच्या उसळणार्या लाटांचा आनंद लुटत असताना तोल जाऊन १२ वर्षीय साहिल समुद्रात बुडाला. साहिलला वाचविण्याच्या प्रयत्नात जावेदनेही पाण्यात उडी मारली. पण, साहिलला वाचवण्यात जावेदला अपयश आलं. त्यातच आणखी दुर्देवी गोष्ट म्हणजे या दुर्घटनेत अनेकदा लोकांचा जीव वाचवणाऱ्या जावेदलाही मरण आलं.
- Advertisement -