कोरोनाचे राजकारण करु नका; जया बच्चन यांनी विनय सहस्रबुद्धेंना सुनावले

भाजपचे राज्यसभेतील खासदर विनय सहस्रबुद्धे यांनी कोरोनावर उपाययोजना करत असताना मुंबई आणि महाराष्ट्राने कशा चुका केल्या? याचा पाढाच राज्यसभेत वाचला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कसे घरी बसून आहेत? याचेही दाखले दिले. एक मराठी आमदार महाराष्ट्रावर टीका करत असताना जया बच्चन यांना मात्र राहावलं नाही. त्यांनी विनय सहस्रबुद्धे यांचे भाषण झाल्यानंतर पुन्हा उभे राहून मुंबईने खूप चांगले काम केले असल्याचे ठणकावून सांगितले. तसेच कोरोना वरुन राजकारण करणे, चुकीचे असल्याचेही अधोरेखित केले.