उद्धव ठाकरेंवर जयंत पाटील यांची स्तुतीसुमनं

Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गुणांबद्दल सांगली येथे भाष्य केले. महाराष्ट्राला ज्या पद्धतीचा मुख्यमंत्री पाहायची सवय आहे, त्यापेक्षा उद्धव ठाकरे हे वेगळे आहेत. त्यामुळे जनतेने हे वेगळे मुख्यमंत्री पाहायची सवय लावून घेतली पाहीजे, असे वक्तव्य करताना जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे चांगलेच कौतुक केले