जिजाऊच शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरु, रामदास नाही

“मला कुणीतरी ‘जाणता राजा’ म्हटलं म्हणून काही लोक आगपाखड करत आहेत. पण या सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की, शिवाजी महाराजांचा इतिहास नीट वाचा. शिवाजी महाराज असताना त्यांना केवळ छत्रपती हीच उपाधी दिली गेली होती. जाणता राजा ही उपाधी रामदासस्वामी यांनी दिली होती. तसेच रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे खरे गुरु नसून जिजाऊमाता याच त्यांच्या गुरु आहेत. ज्यांच्या हातात त्याकाळी लेखणी होती, त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला. त्यामुळे जाणता राजा यावरुन कुणीही वाद निर्माण करु नये. शिवाजी महाराज हे छत्रपतीच होते”, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे.