Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर व्हिडिओ कविता बांगर सांगतेय पार्लरमधील सुव्यवस्था

कविता बांगर सांगतेय पार्लरमधील सुव्यवस्था

MUMBAI

लॉकडाऊनच्या काळात तब्बल तीन महिने सलून, पार्लर, स्पा बंद होते. या आठवड्यापासून मात्र सरकारने राज्यात फक्त केस कापण्याकरता सलून आणि पार्लर व्यावसायिकांना परवानगी दिली आहे. त्यामुळे तीन महिन्यांनंतर पार्लरमध्ये ग्राहकांना जाता येणार आहे. मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारीच्या उपाययोजना पार्लरमध्ये आहेत का? फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम बाजूला ठेवून केस कापताना आपल्याला तर कोणता संसर्ग होणार नाही ना? ही भीती ग्राहकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. मात्र सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून पार्लरमध्ये सोयीसुविधा उपलब्ध केल्यास बिनधोकपणे ग्राहकांना त्यात प्रवेश घेता येणार आहे. सुरक्षेची सर्व खबरदारी घेऊन पार्लर कसे सुसज्ज करावे, याची माहिती यावेळी कविताज ब्युटी केअरच्या कविता बांगर यांनी देत आहेत.