मेट्रो कारशेडवरून किरीट सोमय्यांची आगपाखड

Mumbai

मेट्रो कारशेड आरेमध्ये करण्याच्या कामावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिली असताना इतके दिवस आपली शिवसेना विरोधाची तलवार म्यान केलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आगपाखड करायला सुरुवात केली आहे. सरकारने बेकायदेशीरपणे कारशेडच्या कामावर स्थगिती आणल्याचा आरोप करत हा निर्णय मागे घेण्यात यावा, असं देखील किरीट सोमय्या म्हणाले आहेत.