बिबट्याच्या हल्ल्यात पोलीस जखमी; रहिवाशांमध्ये घबराट

नाशिकमधील वालदेवी नदी काठावर वसलेल्या विहितगावात आज सकाळी बिबट्याने शिरकाव केला आहे. बिबट्याने एका लहानशा घरात आश्रय घेत काही वेळातच तेथून धूम ठोकली. यावेळी एका पोलिसाला त्याने डोक्यावर पंजा मारत जखमी केल्याचे समोर आले आहे. बिबट्याच्या धुमाकूळने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.