खाद्य मिळत नसल्यामुळे कोंबड्यांनी केली एकमेकांना खायला सुरूवात

MUMBAI

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खाद्य मिळत नसल्याने भुकेपोटी कोंबड्या कोंबड्यांच्या जीवावर उठल्या आहेत. पोल्ट्री धारकांना खाद्य पुरवठा करणे अडचणीचे ठरल्याने कोंबड्या आता कोंबड्यांना मारून खाऊ लागल्या आहेत. तासगाव तालुक्यातील पोल्ट्रीमधील एक धक्कादायक व्हीडिओ समोर आला आहे.