राज्यात दोन सर्वोच्च प्रमुखांमध्ये लेटर वॉर!

महाराष्ट्रात मिशन बिगीन अगेन सुरू झाल्यानंतर अनेक आस्थापने सुरू करण्यात आली आहेत. मात्र, अजूनही मंदिरं आणि प्रार्थनास्थळं बंदच असल्यामुळे ती लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. याच मागणीसंदर्भात आज राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून खोचक शब्दांमध्ये मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील खरमरीत उत्तर देत या मुद्द्यावर राज्यपालांना सुनावलं आहे. त्यामुळे आता मंदिरांच्या मुद्द्यावर राज्याच्या दोन सर्वोच्च व्यक्तींमध्ये लेटर वॉर सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.