महाराष्ट्रातील पोलिसांची नागरिकांना भावनिक साद

Mumbai

लॉकडाउनमुळे नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही काही लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी पोलिसांना काठ्यांचा प्रसाद नागरिकांना द्यावा लागत आहे. मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एका पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये लाठीचा वापर न करता एक गाणं म्हणत नागरिकांना आवाहन पोलिसाने केलं आहे. बदलापूर- अंबरनाथ हायवेवरील हा व्हीडीओ आहे.