राज्य सहकारी बँक कर्ज वाटपात माझा सहभागच नव्हता | अजित पवार

Mumbai

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने केलेल्या कर्जवाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सुरींदर अरोरा यांनी केला. त्यानंतर हायकोर्टाने अजित पवारांसहीत ७७ लोकांवर गुन्हा दाखल करण्यास सांगितले. अजित पवारांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच निवडून जवळ आल्यावरच असे आदेश कसे काय निघतात? असा प्रश्न उपस्थित केला आहे.